Wednesday, November 12, 2025

Buy now

spot_img

घरात चक्कर येऊन पडल्यानंतर आता कशी आहे गोविंदाची प्रकृती? ; डॉक्टरांकडून मोठी अपडेट.

मुंबई : बॉलिवूडचा ‘हिरो नंबर वन’ अर्थात अभिनेता गोविंदाची तब्येत अचानक बिघडली आहे. गोविंदाला उपचारासाठी जुहू इथल्या क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. मंगळवार रात्री गोविंद अचानक बेशुद्ध पडला, त्यानंतर त्याला औषधं देण्यात आली. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रात्री 1 वाजता त्याला क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गोविंदाची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती त्याचे जवळचे मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल यांनी दिली आहे. डॉक्टरांनी गोविंदाच्या अनेक चाचण्या केल्या असून, त्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली गोविंदावर उपचार सुरू आहेत.

ललित बिंदल यांनी सांगितलं की, सुरुवातीला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करण्यात आले. पण प्रकृती आणखी बिघडल्याने अखेर त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. गोविंदाला स्वतः ललित बिंदल रुग्णालयात घेऊन गेले. रुग्णालयातील डॉक्टर डॉ. नामजोशी यांनी सांगितलं की, “गोविंदाची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो आपल्या रूममध्ये विश्रांती घेत आहे. त्याच्या विविध चाचण्यांचे निकाल अद्याप आलेले नाहीत, मात्र काळजी करण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही.”

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच गोविंदा स्वतः कार चालवत ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असलेल्या धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी गेला होता. त्या भेटीनंतर त्यांच्या तब्येतीत अचानक बिघाड झाली अशी चर्चा सुरू आहे. जवळपास वर्षभरापूर्वी गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. त्याच्याच हातातून मिसफायर झाल्याचं म्हटलं गेलं होतं. ही गोळी त्याच्या गुडघ्याला लागली होती. तेव्हासुद्धा त्याला क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शस्त्रक्रिया करून त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली होती. त्यानंतर तो बरा झाला होता. कुटुंबीयांसोबत त्याने दिवाळी साजरी केली होती. त्याचे फोटोही सोशल मीडियावर समोर आले होते.

गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. पत्नी सुनीता अहुजाने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र चर्चांनंतर तिने माघार घेतल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली होती. विविध मुलाखतींमध्ये सुनीता तिच्या आणि गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली होती.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles