Wednesday, November 12, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडीत १६ रोजी मोफत ‘महाआरोग्य’ शिबीराचं आयोजन. ; पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आर. जी.  स्टोन हॉस्पिटल यांचा पुढाकार.

सावंतवाडी : पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट आणि आर. जी.  स्टोन हॉस्पिटल यांच्या माध्यमातून सावंतवाडीत मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आल आहे. मोफत सल्ला व मोफत तपासणी या शिबिरात होणार असल्याची माहिती डॉ. रूत्वीज पाटणकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. पाटणकर म्हणाले, १६ नोव्हेंबर २०२५ ला सकाळी १० ते ४ या वेळेत राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात हे शिबीर होणार आहे. यात मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, पित्तशय खडे, हर्निया, मूळव्याध, ओव्हरीयन सिस्ट, आहारतज्ञ, गर्भाशयाच्या गाठी आदींचा मोफत सल्ला तसेच डोळे तपासणी, हिमोग्लोबिन, रक्त शर्करा, युरोफ्लोमेट्री आदी मोफत तपासण्या होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली. तसेच गोवा मेडिकल कॉलेजमध्ये मी काम केलय. आता आरजी स्टोन हॉस्पिटलशी मी जोडला गेलो असून माझ्या जन्मभूमीतील लोकांना फायदा व्हावा, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. यानंतर दर रविवारी सावंतवाडीत आरजी स्टोनच्या माध्यमातून ओपीडी देखील सुरु होणार असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. यावेळी डॉ. भावेश पटेल, ॲड. रूजूल पाटणकर आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles