Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

मराठी भाषा गौरव दिन.! – विशेष माहितीपर लेख.

दिनविशेष – 

महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या आपल्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रासह अनेक राज्यांत मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठीतील आदरणीय कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन करण्याची परंपरा आहे. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेची अस्मिता टिकवण्यासाठी तिच्या सन्मासाठी आयुष्यभर अथक प्रयत्न केले, त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचा, मराठी संस्कृती अन् साहित्याचा हा गौरव दिन आहे.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी, विष्णू वामन शिरवाडकर. यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्तानं 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारनं घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण ‘मराठी राजभाषा दिन’ असंही म्हणतात. पण ‘मराठी भाषा गौरव दिवस’ आणि ‘मराठी राजभाषा दिवस’ हे दोन्ही वेगवेगळे आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा, तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला. त्यामुळे शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं. त्यामुळे आज ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो आणि 1 मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा केला जातो.

महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं दैदीप्यमान रत्न म्हणजे ‘कुसुमाग्रज’ –

महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच, कुसुमाग्रज यांचं मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रज यांचा जन्म नाशिक येथे 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला. नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिरवाडे हे त्यांचं जन्मगाव. वि. वा. शिरवाडकर यांच्या मोठ्या बहिणीचं नाव कुसुम होतं. त्या नावावरुनच त्यांनी कवी म्हणून कुसुमाग्रज हे नाव वापरलं. कुसुमाग्रज यांनी आपल्या आत्मनिष्ठ प्रतिभेनं आणि समाजनिष्ठ भावस्पर्शी लेखणीनं जागतिक दर्जाचं लेखन केलं.

आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून आणि कुसुमाग्रज यांना अभिवादन सरकारनं म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. तेव्हापासून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रजांनी मराठीसाठी जीवन वेचलं –

मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. कुसुमाग्रज हे मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजवणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि समीक्षक होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्द-कलेवरचं प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीनं त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावानं त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचं आकलन करायला प्रवृत्त केलं. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झालं आहे.

अक्षरबाग (1990), किनारा(1952), चाफा(1998), छंदोमयी (1982), जाईचा कुंज (1936), जीवन लहरी(1933), थांब सहेली (2002), पांथेय (1989), प्रवासी पक्षी (1989), मराठी माती (1960) ही कुसुमाग्रजांचे गाजलेले कवितासंग्रह. तर, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, किमयागार, कैकेयी, नटसम्राट ही त्यांची गाजलेली नाटकं. कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्याही कुसुमाग्रजांनी लिहिल्यात.

  • मराठी भाषेसाठी काही घोष वाक्ये –
  • आम्ही जपतो आमची संस्कृती, आमची निष्ठा आहे मराठी माती

• लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी !

. रुजवू मराठी, फुलवू मराठी, चला बोलू फक्त मराठी

. माझा मराठीचे बोलू कौतुके परी अमृतातेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन

. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा

* घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीलाआपणच आपल्या उद्धारासाठी चला बोलूया मराठी

. आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी असल्याचा!!!

. जिच्यासाठी केला होता अट्टाहास, थांबवूया आता मराठीचा हास

.  मान आहे मराठी भाषेचा आपल्या मनी, शुभेच्छा तुम्हाला सर्वांना मराठी भाषा दिनी

. आपणच आपणास तारी, मराठीची किमया लय भारी

.  बोलावे शुद्ध, ऐकावे शुद्ध, लिहावे शुद्ध, मराठीच्या उद्धारासाठी कंबर कसुनी आम्ही कटिबद्ध.

मराठी राजभाषा दिनानिमित्त काही निवडक शुभेच्छा –

🎯“माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!”

🎯“माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळवीन।।”

🎯“मराठी माझी जात! मराठी माझा धर्म! मराठी माझी माती! मराठी माझं रक्त! मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”

🎯“रुजवू मराठी, फुलवू मराठी चला बोलू फक्त मराठी मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र मराठी ला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवाना… मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”

🎯“अंगणात तुळस आणि शिखरावर कळस, हिच आहे मराठी महाराष्ट्राची ओळख, कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हिच आहे सौभाग्याची ओळख, माणसात जपतो माणुसकी, आणि नात्यात जपतो नाती, हिच आमची ओळख, माय मानतो मराठी,गर्व आहे मराठी असल्याचा मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा”

🎯“माझ्या मराठीची कास तिला नावीन्याची आस तिच्या अस्तित्वाचा भास काय वर्णावे..!”

🎯“माय मराठीचा दिमाख आगळा वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा, हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी”

🎯“जन्मदात्री ने जग दाखवले माय मराठी ने जग शिकवले भिन्न धर्म व भिन्न जाती महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती अभिमान हा जन मनी वसे मराठी आपली मायबोली असे मराठी दिनाच्या शुभेच्छा”

  • मराठी भाषा गौरव दिनाच्या मनस्वी शुभकामना..!
  • (स्त्रोत- विकिपीडिया)

 

  • ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles