Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलची मनवा साळगावकर ठरली अव्वल! ; सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपक्रम.

सावंतवाडी : तालुक्यातील नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोक सावंत, सचिव गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, पत्रकार संघाचे सहसचिव विनायक गांवस, सदस्य पत्रकार सचिन रेडकर, दिव्या वायंगणकर, पत्रकार शैलेश मयेकर, संजय पिळणकर, मुख्याध्यापिका सौ. सुविधा केरकर आदी उपस्थित होते. यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे परीक्षण सौ. गौरवी पेडणेकर व गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.

सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन गटांमध्ये विभागलेली होती. या स्पर्धेत पहिल्या गटात सावंतवाडी तालुक्यातील एकूण बारा विद्यार्थ्यांनी तर, दुसऱ्या गटात एकूण पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधील, पहिल्या गटात प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. मनवा प्रसाद साळगावकर या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. ‘पुस्तक माझा खरा मित्र’ हा या स्पर्धेचा विषय निवडून पुस्तकाचे व वाचनाचे महत्त्व आपल्या भाषणातून पटवून दिले. प्रथम क्रमांकाने विजयी मनवाला ११११/ रुपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

कु. मनवा प्रसाद साळगावकर हिला तिच्या पालकांचे व प्रशालेतील मराठी विषयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ. चैताली वेर्लेकर व सौ. आस्था चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी मनवाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles