कुडाळ : अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने झाराप झिरो पॉइंट येथे आज १ मार्च २०२५ सकाळी १०.०० वाजल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतराबाबत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले गेले, आणि या लाक्षणिक उपोषणाची दखल पोलीस प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून घेतली गेली आणि त्यांनी छत्रपतींच्या लौकिकास साजेल असा पुतळा उभारला जाईल आणि त्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचे पदाधिकारी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ, पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे आणि जो पर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या पुतळ्याचे स्थलांतरण केले जाणार नाही असे रात्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले त्यामुळे आज रोजीचे मराठा महासंघाने पुकारलेले आंदोलन हे तात्पुरते स्थगित करण्यात आलेले आहे. जर शासनाने यामध्ये कोणत्याही प्रकारची दगाबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी आंदोलनामध्ये मराठा महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष संतोष परब, मराठा महासंघ सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विनय गायकवाड, शिवप्रेमी रुपेश बिडये, आशिष काष्टे, विनायक गावडे, पुंडलिक दळवी, प्रसाद राऊळ, विशाल सावंत, संदीप गवस, आशिष जळवी आदी बहुसंख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
अंतिम निर्णय झाल्याशिवाय झाराप येथील पुतळ्याला हात लावला जाणार नाही.! : राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने दिले लेखी आश्वासन.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


