Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

महाराष्ट्र शासनाचा ‘मेटा’सोबत करार.! ; नागरिकांना ५०० प्रकारच्या सेवा मिळणार व्हॉट्सअ‍ॅपवर, मुख्यमंत्र्यांची घोषणा.

मुंबई : महाराष्ट्र शासनाने जगातील सर्वात मोठी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘मेटा’सोबत करार केला आहे. यामुळे शासनाच्या 500 सेवा आता व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे लोकांना कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वरळी येथे ‘परिवहन भवन’ या नव्या इमारतीचे भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

परिवहन विभागातील तो प्रकार शिंदे साहेबांमुळे बंद –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिंदे साहेबांकडे परिवहन विभाग आला तेव्हा त्यांनी अनेक बदल केले. त्यांनी परिवहन विभाग ज्या कारणासाठी बदनाम झाला होता, तोच प्रकार रद्द केला. परिवहन विभागातील सर्व बदल्या ऑनलाइन स्वरूपात सुरु केल्या. त्यामुळे पारदर्शकता आली. ऑनलाइन पद्धत सुरु केली आहे आणि भ्रष्टाचार बंद केला. शिंदे साहेबांच्या काळात हा निर्णय घेतला गेला.

देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व टीमचे कौतूक केले. ते म्हणाले, राज्याच्या परिवहन विभागाला तब्बल ८५ वर्षानंतर स्वत:चे हक्काचे कार्यालय मिळाले. त्यासाठी या सर्वांनी जागा शोधली आणि काम सुरू केले. आता या ठिकाणी पुढील परवानगीसाठी आपण संरक्षण विभागाला पत्र देणार आहे. परंतु या इमारतीच्या 16 व्या मजल्यावर मला, शिंदे साहेब आणि अजितदादांना केबीन द्या.!

ADVT –

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles