खेड : खेड तालुक्यातील एका व्यक्तीची 14 लाख 28 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत विठ्ठल मिरजकर (55, रा. भाईंदर पूर्व, जि. ठाणे) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदार यांना 16 नोव्हेंबर 2019 ते 22 मे 2023 या कालावधीत घरी असताना, त्यांना ‘मेरिल एज’ नावाच्या टेलिग्राम ग्रुपवरून ट्रेडिंगबाबत माहिती मिळाली. तसेच शशिकांत नावाच्या व्यक्तीने फोन करून, मी मेरिल एज ग्रुपवर प्रशिक्षण देतो, तुम्ही पैसे गुंतवा, तुम्हाला जास्त परतावा मिळेल, असे सांगितले. फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी एकूण 14 लाख 28 हजार रुपये गुंतवले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, भाईंदर येथून आरोपीला अटक करून 3 मार्च 2025 रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली) ही कारवाई पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भागुजी औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन भोयर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले, पोलिस हवालदार दीपक गोरे, पोलिस शिपाई रुपेश जोगी, पो. कॉ. वैभव ओहोळ, पोलि कॉ. राम नागुलबार आणि तांत्रिक विश्लेषण शाखेतील पोलिस हवालदार रमीज शेख यांनी केली.
आरोपीला भाईंदर येथून अटक –
खेड पोलिसांनी तांत्रिक तपास आणि बँकेच्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. आरोपी भाईंदर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला 2 मार्च 2025 रोजी अटक केली.
ADVT –



