मुंबई : बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी ही लाईव्ह स्ट्रीम करावी, अशी मागणी वकील असीम सरोदे यांनी काल केली आहे. त्यानंतर आज सरोदे यांनी वृत्त वाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, लोकसभेचं स्वत:च चॅनेल आहे, विधानसभेचंसुद्धा आहे. सुप्रीम कोर्टाने देखील आता सुनावणीचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलेलं आहे. यातून लोकांचा सहभाग वाढतो. पारदर्शकता वाढते. लोकप्रतिनिधी, वकील, न्यायाधीश हे काय काम करतात हे जनतेला समजतं. मस्साजोगचं संतोष देशमुख हत्या प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणात जे गुन्हेगारीचं संघटन सुरू आहे त्यातल्या सुनावणीचा महत्वाचा भाग लोकांना बघता यावा. काही साक्षी पुरव्यांचे भाग बघता येणार नाही, त्याबद्दल काही बंधनं आखता येतील. ही माझ्या एकट्याची नाही, तर महाराष्ट्राची मागणी असली पाहिजे, असंही असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


