दुबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी महामुकाबला होत आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर मिचेल सँटनर याच्याकडे न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. दोन्ही संघ याआधी साखळी फेरीत भिडले होते. भारताने तेव्हा न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. मात्र आजचा अंतिम सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघात ट्रॉफी जिंकण्यासाठी जोरदार रस्सीखेच असणार आहे. या महाअंतिम सामन्याबाबतची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
टीम इंडिया निरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ याआधी 2000 साली चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. तेव्हा न्यूझीलंडने टीम इंडियावर मात करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता टीम इंडियाकडे यंदा अंतिम सामन्यात विजय मिळवून या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.
न्यूझीलंड टीम : मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरुर्के, डॅरिल मिशेल, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन आणि जेकब डफी.


