दुबई : न्यूझीलंडने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 251 धावा केल्या. न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक धावा केल्या. मिचेलने 63 धावा केल्या. मायकल ब्रेसवेल यानेही अर्धशतकी खेळी केली. तसेच इतर फलंदाजांनाही चांगली आणि अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारतीय गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता भारतीय फलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. आता ही अनुभवी जोडी विजयी धावांचा पाठलाग करताना कशी बॅटिंग करतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मिचेल – ब्रेसवेलची अर्धशतके, टीम इंडियासमोर २५२ धावांचं आव्हान.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


