Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात ‘मनसे’ धडक! ; अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना आरोग्य प्रश्नावर घेराव.

सावंतवाडी :  येथील उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत तसेच हॉस्पिटलमध्ये सिविल सर्जन, रेडिओलॉजी, भूलतज्ञ आदी पदे रिक्त आहेत यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आज उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीषकुमार चौगुले यांना घेराव घालण्यात आला. रुग्णालयात दोन रुग्णवाहिका उपलब्ध आहेत पण एका ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहे एका ठिकाणी डॉक्टर उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णांची सुद्धा गैरसोय होते पालकमंत्री श्री नितेश राणे यांनी भेट दिली त्यावेळी या समस्या आपण त्यांना सांगितला का असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. तसेच सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांनी गरोदर महिलांवर शस्त्रक्रिया केली जाते त्यावर काही महिलांना इन्फेक्शन झालेले आहे असे सांगितले त्यावेळी वैद्यकीय अधिकारी श्री. चौगुले यांनी मान्य केलं की असे चार रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये मिळाल्यानंतर तातडीने ऑपरेशनथिटर दोन दिवस बंद ठेवण्यात आलं होतं नंतर पुन्हा या ठिकाणी सर्व क्लिनिंग करून ते चालू केलं असं सांगितलं या सर्वाला आपण जबाबदार आहात असे गवंडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे रुग्णांची टेस्ट इन्फेक्शन झाल्यानंतर ती प्रायव्हेट लॅब का करावे लागते.या म्हणून या सर्व गोष्टी बाबतीत आपण योग्य ती दखल घेऊन कार्यवाही नाही केल्यास आम्हाला पुन्हा या ठिकाणी भेट द्यावी लागेल असा इशारा ही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. हॉस्पिटलमध्ये असणारे शिकाऊ डॉक्टर हे हिंदी भाषा बोलतात त्यामुळे रुग्णांना याबाबत काही समजत नाही त्यामुळे त्यांना मराठीत बोलायला सांगा त्यावर त्यांनी उत्तर दिलं की डॉक्टर हे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून या ठिकाणी आलेले आहेत. बरेचसे डॉक्टर हे दक्षिण भागातील असून त्यांना मराठी येत नाही त्यामुळे मी यापुढे त्यांना तशा सूचना देणार आहे. डायलिसिस सेंटर मध्ये प्रतिक्षा यादी रुग्णांना थांबावं लागतं त्यावर त्यांनी सांगितले की जिल्हा नियोजन मधून एक डायलिसिस सेंटर मशिनरी मंजूर आहे लवकर ते कार्यान्वित होणार आहे यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, उपतालुकाध्यक्ष अतुल केसरकर ,राजेश मामलेकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊळकर, मळगाव विभागीय अध्यक्ष राकेश परब आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles