सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा हायस्कूल आरोंदाच्या सभागृहात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी विचार मंचावर आरोंदा ग्रामपंचायत सदस्य शिल्पा नाईक, स्मिताली नाईक, प्रशालेच्या ज्येष्ठ अध्यापिका सौ. भावना माजगावकर , सौ. कोरगावकर कलाशिक्षक चंदन गोसावी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या ग्रामपंचायत सदस्य स्मिताली नाईक व शिल्पा नाईक यांचे अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला तसेच विचारमंचावर उपस्थित असलेल्या महिला अध्यापिका सौ.भावना माजगावकर , सौ.सुप्रिया कोरगावकर, सौ. मेघना गडेकर यांचाही पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. माजगावकर यांनी अंतराळ, कला, क्रीडा, संगीत, शिक्षण, आरोग्य, समाजसेवा या विविध क्षेत्रातील महान महिलांच्या कार्याचा महिमा सांगितला व त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले व विद्यमान कालखंडात स्त्री चौफेर प्रगती करत असताना होणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली व स्त्री पुरुष समानता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

शालेय विद्यार्थिनींनी स्त्री सन्मान गीते सादर केली त्यांना कलाशिक्षक श्री चंदन गोसावी यांनी संगीतसाथ दिली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी कर्तबगार स्त्रियांचा इतिहास आपल्या वक्तृत्वातून मांडला. सदरील विद्यार्थ्यांना सौ. माजगावकर व कोरगावकर यांनी मार्गदर्शन केले तर
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून वाहवा मिळवली. सदरील विद्यार्थ्यांना श्री श्रीकृष्ण गावडे व श्री हर्षद चोडणकर यांनी मार्गदर्शन केले.
यानिमित्ताने संस्था सदस्य श्री नारायणराव आरोंदेकर हेही उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन व समारोप सौ.कोरगावकर यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमात असा सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भावना माजगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. सुप्रिया कोरगावकर यांनी केले.
ADVT –

सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


