सावंतवाडी : येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धवल यश प्राप्त केले. या स्पर्धेची प्रथम फेरी जानेवारीमध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेत ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी, १७ विद्यार्थ्यांना बेस्ट इन स्कूल मधून निवडण्यात आले व या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी बांदेकर कॉलेजमध्ये निमंत्रित केले गेले. ही स्पर्धा रविवार, दिनांक ९ मार्च २०२५ रोजी घेण्यात आली. यामध्ये, ए, बी , सी असे तीन गट होते. त्यातील बी गटामधील प्रशालेतील इयत्ता तिसरीमधील ‘ कु. प्रार्थना प्रणय नाईक’ हिने प्रथम क्रमांक पटकावला. या विद्यार्थिनीला दोन हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर ‘कु. वेद हरेश बेळगावकर ‘ याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच, सी गटातील प्रशालेतील ‘ कु. भुवन पुंडलिक दळवी ‘ याने तृतीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्याला पाचशे रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे व प्रशालेतील कला शिक्षिका सौ. सुषमा पालव व कु. विनायकी जबडे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशालेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


