सावंतवाडी : राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचा इतिहास विषयाचा अभ्यास कच्चा आहे. कारण ते इंग्रजी माध्यमातून शिकले आहेत. इतिहासाची तोडफोड करून ते दोन धर्मांमध्ये विनाकारण वाद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्क्रिप्ट पाठवतो आणि मंत्री नितेश राणे तेच बोलतात हेच नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना आरएसएस बद्दल किती खालच्या पातळीवर जाऊन बोलले आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा गुन्हा गोविंदाने नांदत असलेला आदर्श जिल्हा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्क्रीप्ट देत अन् मंत्री नितेश राणे बोलतात. सिंधुदुर्गात गुण्यागोविंदाने लोकं नांदत आहेत. त्यामुळे ‘झटका आणि फटका’ हा विषय त्यांनी आणू नये. इंग्रजी मिडियला राणे शिकल्यान त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास नव्हता. तो आम्हाला शिकवला गेला आहे. विनाकारण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राणेंनी करू नये. या जिल्ह्यात ‘आरएसएस’ची स्क्रिप्ट वापरून वाद निर्माण करण्याचे कार्य मंत्री नितेश राणे यांनी करू नये. आम्ही मराठी माध्यमातून शिकल्यामुळे आमचा इतिहास पक्का आहे, असा जोरदार टोला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे यांना लगावला. यावेळी आशिष सुभेदार, शब्बिर माणियार व अन्य उपस्थित होते.
हिंदुत्वाची भाषा मग मुस्लिम बांधवांचे पक्षप्रवेश का.?
दरम्यान माजी आमदार उपरकर पुढे म्हणाले, नितेश राणे सातत्याने ‘हिंदुत्व… हिंदुत्व… हिंदुत्व’ असे शब्द उच्चारतात. मुस्लिम समाजातील बांधवांवर टीका करतात. मात्र गेल्याच आठवड्यात त्यांनी अनेक मुस्लिम बांधवांना भाजपात घेतले आहे. मग सत्तेसाठी तेव्हा हिंदुत्व कुठे गेले होते? मंत्री नितेश राणेंच्या मंत्रिपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिफारस केल्याची माहिती आपणास मिळाली असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.
सिंधुदुर्गातील आरोग्य प्रश्न जनतेचे प्रश्न कधी सोडवणार.?
दरम्यान माजी आमदार उपरकर पुढे म्हणाले घोषणाबाज मंत्री नितेश राणे यांना सिंधुदुर्गातील आरोग्य, बेरोजगारी हे प्रश्न का दिसत नाहीत? अगोदर शिवसेना नंतर काँग्रेस मग स्वाभिमान आणि आता भारतीय जनता पार्टीत ते आहेत. ज्या मनसे अध्यक्षांनी त्यांच्या वडिलांच्या खासदारकीच्या निवडणुकीत सभा घेतली. त्यांच्यावरही त्यांनी टीका केली. एकीकडे वडिलांना निवडून आणण्यासाठी राज ठाकरेंची सभा लावायची आणि जिंकून आल्यावर त्यांच्यावरच टीका करायची, अशी त्यांची स्वार्थी वृत्ती आहे. काही दिवसांनी ते भाजप नेत्यांवरही टीका करतील. त्यामुळे भाजपावासीयांनी सावध राहावे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.


