वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दुसरा कार्यकाळ आहे. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्या लष्करी कारवाईचा आदेश दिला. त्या आदेशावर अमेरिकन सैन्य दलाने तात्काळ अमलबजावणी केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन एअर फोर्सने येमेनमधील हुती दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले केले. लाल सागरात जहाजांवर हल्ले झाल्यानंतर ‘नरकाचा पाऊस पडेल’ असा डोनाल्ड ट्रम्प यांनी हुती दहशतवाद्यांना इशारा दिला होता. अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यात कमीत कमी 19 लोक मारले गेले आहेत. अनेक जण जखमी आहेत.
शेवटचा हल्ला कधी झालेला?
अमेरिकेच्या जहाजांवर कितीवेळा हल्ला?
व्हाइट हाऊसने प्रेस रिलीजमध्ये माहिती दिलीय की, “हल्ले सुरु होण्याआधी वर्षाला 25 हजार जहाजं लाल सागरातून जायची. पण आता ही संख्या 10 हजारवर आली आहे” प्रेस रिलीजनुसार, 2023 पासून आतापर्यंत अमेरिकेच्या व्यापारी जहाजांवर 145 वेळा हल्ला झाले आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीआधी शेवटचा हल्ला डिसेंबर महिन्यात झाला होता.
मर्यादीत स्वरुपाची सैन्य कारवाई का?
गाझा पट्टीत युद्ध विराम लागू झाल्यानंतरही इस्रायलकडून हल्ले सुरुच आहेत. अलीकडे बेत लाहियामध्ये झालेल्या हल्ल्यात बचावकर्मी, पत्रकारांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. हे हल्ले म्हणजे सीजफायरच उल्लंघन असल्याचा हमासचा दावा आहे. हमासवर बंधकांच्या सुटकेचा दबाव टाकण्यासाठी इस्रायल गाझा पट्टीत मर्यादीत स्वरुपाची सैन्य कारवाई करु शकतो.
ADVT –





