सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सिंधुदुर्गच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना कळविण्यात येते की, उद्या सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक साडेदहा वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग ओरोस यांच्या समवेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न यामध्ये मुख्याध्यापक प्रस्ताव, वरिष्ठ वेतन, श्रेणी निवड श्रेणी, फरकाची बिल, मेडिकल बिल, शिक्षकेतर कर्मचारी समायोजन इतर विषयावर राज्य अध्यक्ष श्री. वेणुनाथ कडू सर, कोकण विभाग कार्यवाह श्री. वालगुडे सर, कोकण विभाग कोषाध्यक्ष श्री. सागडे सर, तसेच जिल्हा पदाधिकारी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यकर्ते यांची सहविचार सभा होणार आहे.
तरी ज्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत त्यांनी आणि इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यकर्ते यांनी कृपया वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कार्यवाह नंदन घोगळे, कोकण विभाग कार्याध्यक्ष कोकण सलिम तकीलदार, महिला आघाडी प्रमुख सिंधुदुर्ग सौ. तावडे मॅडम, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर सोन्सुरकर, सह कोषाध्यक्ष सिंधुदुर्ग श्री. राठोड सर आणि माहिती आणि प्रसारण सल्लागार प्रा. रुपेश पाटील यांनी कळविले आहे.


