सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा यशस्वी युवा उद्योजक दिनेश गावडे यांनी कुडाळ – मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांना वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. रविवारी सावंतवाडी येथील मँगो हॉटेल येथे संपन्न झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आपल्या हितचिंतकांसह आमदार निलेश राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आमदार निलेश राणे यांच्यासाठी आणलेला भला मोठा पुष्पहार हा अतिशय आकर्षक व चर्चेचा विषय ठरला.


दरम्यान या एकाच हारात माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे या दोघांनाही पुष्पहार प्रदान करत दिनेश गावडे व मित्रपरिवाराने अनोख्या शुभेच्छा बहाल केल्या. यावेळी दिनेश गावडे यांच्या समवेत संजय गावडे, यश गावडे, संतोष शेटे, अक्षय गावडे, समीर गावडे, बबन रेडकर, आनंद गावडे, नारायण गावडे, तुकाराम गावडे, धनंजय गावडे आदी उपस्थित होते.
सावंतवाडी येथील संजू परब मित्र मंडळ व सह्याद्री फाऊंडेशन यांच्याकडून सदर अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

ADVT –




