मुंबई : दिनांक १० फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत जीडीएसच्या २१ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते. आता उमेदवार त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. या प्रक्रियेद्वारे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म या भरतीसाठी स्वीकारला गेला आहे की नाही?, हे पाहता येईल. या भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
भारतीय टपाल सेवेने २१४१३ पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची स्थिती जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी GDS २०२५ भरतीसाठी अर्ज केला आहे ते अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर त्यांच्या फॉर्मची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात. GDS अर्ज स्थिती २०२५ लिंक सक्रिय केली गेली आहे. ज्या उमेदवारांचे फॉर्म स्वीकारले गेले आहेत ते पुढील टप्प्यात जातील.
१० फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत जीडीएसच्या २१ हजारांहून अधिक पदांसाठी अर्ज स्वीकारण्यात आले होते. आता उमेदवार त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात. या प्रक्रियेद्वारे, उमेदवारांना त्यांचा फॉर्म या भरतीसाठी स्वीकारला गेला आहे की नाही हे पाहता येईल. या भरतीमध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांची निवड कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. यासाठी टपाल विभागाकडून गुणवत्ता यादी जारी केली जाईल. पहिली गुणवत्ता यादी ३१ मार्च २०२५ पर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
‘अशी’ तपासा जीडीएस अर्जाची स्थिती –
– सर्वप्रथम इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in वर जा.
– येथे GDS अर्ज स्थिती फॉर्म २०२५ च्या लिंकवर जा.
– तुमचा नोंदणी क्रमांक येथे प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
– तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्यासमोर येईल.
उमेदवार अर्जाच्या स्थितीद्वारे त्यांचा अर्ज ऑनलाइन ट्रॅक करू शकतात. जीडीएस सरकारी नोकरी भरतीमध्ये, राज्यवार स्वतंत्र गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. ज्यामध्ये मंडळनिहाय निवडलेल्या उमेदवारांची नावे आणि रोल नंबर आहेत. ग्रामीण डाक सेवक पदांसाठी गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर, उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


