Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘मल्लसम्राट’चा पठ्ठ्या नागेश सूर्यवंशी ठरला ‘सिंधुदुर्ग केसरी’. ; महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी झाली निवड.

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने कर्जत जि. अहिल्यादेवीनगर येथे होणार्‍या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या संघाची जिल्हा निवड चाचणी देवज्ञ गणपती मंदिर, सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत ‘मल्लसम्राट’ प्रतिष्ठानचा पठ्ठ्या नागेश सूर्यवंशी ‘सिंधुदुर्ग केसरी’ ठरला असून त्याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या राज्य स्पर्धेसाठी पात्र कुस्तीगीरांचा संघ निवडण्यात आला.

राज्य स्पर्धेसाठी निवडलेला संघ खालील प्रमाणे – 
57 किलो – 1)बुधाजी हरमलकर (सावंतवाडी)
61 किलो – 1)आदित्य हरमलकर (सावंतवाडी)
65 किलो – 1) दशरथ गोंडयाळकर (सावंतवाडी)
70 किलो – 1) कुणाल परब (सावंतवाडी), 2) पवन गोंधळी (सावंतवाडी)
74 किलो – 1) महमद शरीफ समीर शेख (सावंतवाडी)
79 किलो – 1) सिद्धार्थ गावडे (वेंगुर्ला)
86 किलो – 1) चेतन राणे (कणकवली)
92 किलो – 1) योगेश रावल (सावंतवाडी)
97 किलो – 1) मृणाल शिरोडकर
86 ते 125 किलो – 1) नागेश सूर्यवंशी (सावंतवाडी)
यांची निवड करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापकम्हणून पैलवान श्री ललित हरमलकर व मार्गदर्शन श्री. हर्षद मोर्जे (वेंगुर्ला) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जत जि. अहिल्यादेवीनगर येथे होणार्‍या राज्य वरिष्ठ गट व महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्व कुस्तीगीराना सिंधुदुर्ग जिल्हा कुस्ती संघटनेच्या वतीने संघटनेचे सचिव श्री. दाजी रेडकर यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles