Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

नागपूरमध्ये पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन.! ; ८० जणांना अटक, शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी.

नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.

नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे. महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

नागपूरमधील कोणत्या भागांमध्ये संचारबंदी?

गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सकरदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर, कपीलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याठिकाणी वैद्यकीय कारण वगळून इतर कारणासाठी कोणीही घराबाहेर पडणार नाही. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles