कणकवली : कणकवली महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली होती . महिला दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.याप्रसंगी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य युवराज महालिंगे, प्रमुख अतिथी प्रा.पूनम गायकवाड ,कनिष्ठ प्रर्यवेक्षक प्रा.महादेव माने,महिला विकास कक्ष प्रमुख प्रा.विद्या मारकड,प्रा .विनिता ढोके,प्रा.स्नेहा वंजारी, प्रा.मीना महाडेश्वर उपस्थित होते.
हस्ताक्षर स्पर्धेत एकूण 180 विद्यार्थ्यां सहभागी झाले होते. या स्पर्धेचा शाखानिहाय निकाल पुढीलप्रमाणे –
कला शाखा –
१) प्रथम क्रमांक – कु.मानसी विजय गावडे
२) द्वितीय क्रमांक – कु.सलोनी संजय मोरये
३) तृतीय क्रमांक – कु.राधिका श्रीराम पालव
४) उत्तेजनार्थ – कु.अर्पिता अरविंद सावंत
वाणिज्य शाखा –
१)प्रथम क्रमांक – कु.प्रीती प्रकाश परब
२) द्वितीय क्रमांक – कु.तन्वी देवदास तेली
३) तृतीय क्रमांक – कु.भूमिका मंगेश पांचाळ
४) उत्तेजनार्थ – कु. फेलिस्टीना फर्नांडिस
विज्ञान शाखा –
१)प्रथम क्रमांक – कु.अनिषा राजाराम ताटे
२) द्वितीय क्रमांक – कु .नेहा सत्यवान गावकर
३) तृतीय क्रमांक – कु. ज्ञानेश्वरी प्रदिप पारकर
४) उत्तेजनार्थ – कु.अनुषा सतिश गिरकर
संगणकशास्त्र –
१)प्रथम क्रमांक – कु.दिक्षा सत्यवान सुतार
२) द्वितीय क्रमांक – कु.हर्षाली प्रकाश गिरकर
३) तृतीय क्रमांक – कु.कोमल मंगेश गोगटे
४)उत्तेजनार्थ – कु. मानसी महेश वालावलकर
वाणिज्य व वित्त शाखा –
१) प्रथम क्रमांक – कु.वैष्णवी महेश कुणकेरकर
२) द्वितीय क्रमांक – कु.अपेक्षा शामसुंदर घाडीगावकर
३) तृतीय क्रमांक – कु.यश संदीप दळवी
४) उत्तेजनार्थ – कु.अदिती सुरेंद्र जिकडे
या स्पर्धेसाठी विद्यामंदिर हायस्कूलचे कला शिक्षक श्री.प्रसाद राणे सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.तसेच प्राचार्य युवराज महालिंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याचबरोबर इंग्रजी विभाग प्रमुख. प्रा.स्वीटी जाधव,प्रा.प्रविण कडूकर व प्रा.वैशाली पाटील यांनी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी विशेष सहकार्य केले.


