सिंधुदुर्गनगरी : ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 23 नुसार जिल्हास्तरांवर जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची सभा प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला किंवा 15 तारखेला कार्यालयीन सुट्टी असल्यास लगतच्या कार्यालयीन दिवशी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे.
तालुकास्तरावरील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रार निवारणासाठी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तालुकास्तरीय तक्रारकर्त्यांचे समाधान न झाल्यास संबंधित तक्रारकर्ते जिल्हास्तरावर अपिल अर्ज दाखल करु शकतात.
त्याअनुषंगाने जिल्हा तक्रार निवारण समिती सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हास्तरावरील दिव्यांग व्यक्तींचे तक्रार अर्ज पुढील सभेपूर्वी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथील सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावे. याबाबत काही अडचण असल्यास सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग (संपर्क क्र. ९४२२५९६६४६) यांना संपर्क साधावा.
खातेप्रमुख जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विभाग प्रमुख दर सोमवार व गुरुवारी मुख्यालयात उपस्थित राहणार आहेत. तरी ज्या नागरीकांना भेट घ्यावयाची आहे, त्यांनी वरील नमुद दिवशी कार्यालयीन वेळेत भेट घेऊ शकता.
दिव्यांग व्यक्तींची तक्रार निवारण सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला होणार.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


