Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

संजू परब यांची शिवसेनेच्या ‘जिल्हाप्रमुख’ पदी निवड !

सावंतवाडी : शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या ‘जिल्हाप्रमुख’ पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे नेते प्रेमानंद देसाई यांनी दिली.

श्री. परब हे आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांची काम करण्याची पद्धत अनोखी आहे. नुकतेच ते भाजपामधून श्री. राणे यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी त्यांनी सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यांची मूळ शिवसेनेतून सुरुवात झाली. शाखाप्रमुख पासून त्यांनी हा प्रवास सुरू केला. त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद, भाजपचे प्रवक्ते अशी अनेक पदे त्यांनी सांभाळले आहेत. युवा कार्यकर्त्यांचा मोठा त्यांचा संपर्क आहे. त्यामुळे त्यांची ताकद मोठी आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. आज त्यांची ही निवड करण्यात आली.

याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर, उपनेते आनंद जाधव, सभागृहाचे नेते पांडुरंग पाटील, प्रेमानंद देसाई, बंटी पुरोहित, सचिन वालावलकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, आबा केसरकर, सुजित कोरगांवकर, समीर पालव आदी उपस्थित होते.

संजू परब यांची आमदार निलेश राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख आहे. आ. निलेश राणे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर संजू परब यांनी देखील त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. एक उत्तम संघटक म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात तत्कालीन शिवसेनेतूनच झाली होती. शाखाप्रमुखपासून त्यांनी हा प्रवास सुरू केला होता. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर ते देखील काँग्रेसवासी झाले होते. काँग्रेसमध्ये युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, त्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष अशा विविध पदावर काम करत असताना त्यांनी पक्षाला मोठे यश प्राप्त करून दिले होते.
नारायण राणे भाजपवासी झाल्यानंतर ते देखील भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हा प्रवक्ते अशी अनेक पदे त्यांनी सांभाळली होती. तसेच बबन साळगावकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी देखील ते निवडून आले होते. अल्पावधीच्या त्या काळात त्यांनी फार मोठे कार्य करीत आपल्या कार्याची छाप सोडली होती.
अलीकडेच विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आ. निलेश राणे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. संघटन कौशल्य व विशेष करून युवा कार्यकर्त्यांचा मोठा संपर्क ही त्यांची ताकद मानली जाते. त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबाबत सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

ADVT –

 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles