Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दिशा सालियनच्या हत्येप्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? ; याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख?

मुंबई : दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय?

दिशा सालियनच्या मालाडमधील घरी आधीपासूनच पार्टी सुरू होती असा याचिकेत उल्लेख. त्यावेळी तिथे एक ग्रुप आला. ज्यामध्ये रोहन राय आणि त्यांचे मित्र होते. यावेळी अचानक आणखी काही लोक आले. ज्यामध्ये आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनू मौर्या, आदित्य ठाकरे यांचे बॉडीगार्ड्स आणि आणखी काही लोक आले असा याचिकेत उल्लेख. यानंतर दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार झाला असा याचिकेत दावा.

हे सगळं पोस्टमार्टम रिपोर्टमधून गायब करण्यात आलं आणि घाईघाईत दिशावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असा याचिकेत आरोप.

दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक कॉल करून हे प्रकरण मॅनेज केलं असाही दावा.

दिशाचा जर इमारतीवरून पडून मृत्यू झाला असेल तर पोलिसांनी केलेल्या वर्णन आणि मृतदेह पडलेली अवस्था यात साधर्म्य नसल्याची माहिती.

घटना घडली त्या इमारतीचे त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज गायब करून बनावट फुटेज त्यात स्टोर करण्यात आले असाही आरोप.

नारायण राणे आणि नितेश राणे यांनी या प्रकरणात आवाज उठवल्यामुळेच त्यांना अटक झाल्याचा दावा.

या प्रकरणात राजकीय शक्ती आणि राजकीय भ्रष्टाचार असल्यानेच दिशाला न्याय मिळाला नाही असा आरोप.

दिशाचा पोस्टमार्टम रिपोर्ट मॅनेज झाला, घटनास्थळाचे सीसीटीव्ही गायब करण्यात आले, महत्वाचे कागदपत्र गहाळ करण्यात आली, राजकीय शक्तीचा वापर करून हे प्रकरण दाबून टाकण्यात आले असा आरोप.

मुंबई पोलिसांनी दिशा सालियनचा मृतदेह कोणत्या अवस्थेत होता यासंदर्भात केलेके दावे पूर्णत खोटे असल्याचा आरोप.

दिशाचा मृतदेह खाजगी गाडीतून मित्रांनी हॉस्पिटलमध्ये नेला. पण पोलिसांनी तो रुग्णवाहिकेतून नेला आणि दिशा नग्नावस्थेत नव्हती. पंचनामा करताना तिचे आईवडील उपस्थित होते, असा केलेला दावा खोटा असल्याचा याचिकेत आरोप.

याचिकेतील प्रमुख मागण्या कोणत्या?

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करून तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा.

किशोरी पेडणेकर यांच्यावर कुटुंबियांवर दबाव टाकून दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा.

पारदर्शक तपास होण्यासाठी राज्याबाहेर तपास होऊ द्यावा.

दिशाच्या पोस्टमार्टेम करतानाचे चित्रीकरण आणि सर्व कागदपत्र समोर आणावीत.

आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनू मोर्या, मुंबई पोलीस आयुक्तांचे आणि आदित्यचे बॉडीगार्डचे घटनेदरम्यानचे मोबाईल टॉवर लोकेशन काढण्यात यावे.

दिशा सालियनचा फोन आणि लॅपटॉप तिचा बॉयफ्रेंड रोहन रायकडे देण्यात आला आहे. तो कुटुंबीयांकडे सोपवावा.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles