सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील महिलांच्या आरोग्याची मोफत तपासणी शिबिराचे आयोजन उद्या शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी करण्यात येणार आहे.हे आरोग्य शिबीर मुंबई येथील उद्योजक जयवंत नाईक यांच्या सहकार्यातून होत आहे.
सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी तालुका पत्रकार संघ तसेच खासकीलवाडा महिला मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी दहा वाजता भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयामध्ये होणार असून याचा लाभ शहरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सचिव बाळासाहेब बोर्डेकर, संचालक उमाकांत वारंग यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरास सामाजिक कार्यकर्त्या सौ. संजना उर्फ मीनल संजू परब, सीमा नाईक तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आणि सर्व कार्यकारिणी आणि सदस्य तसेच सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर्स व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर हे असणार आहेत. या शिबिरामध्ये सावंतवाडी भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर्स नर्सेस पारिचारिका यांच्याकडून तपासणी होणार आहे तर हिमोग्लोबिन कमतरता तसेच अन्य उपचारही मोफत केले जाणार आहेत.


