सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलच्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. इयत्ता पाचवीची कु. प्राची विजय गावकर, तसेच इयत्ता आठवीचे कु. शमिका संजय शेवाळे, कु. श्रीराम मायाप्पा पाटील, कु. वरूण राजेंद्र बिर्जे, कु. संस्कार जगदीश राऊळ हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
यामधील कु. वरूण राजेंद्र बिर्जे, कु. संस्कार जगदीश राऊळ हे विद्यार्थी गणित प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फा. रिचर्ड सालदान्हा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
गणित प्रावीण्य परीक्षेत मिलाग्रीस हायस्कूलचे यश.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


