सावंतवाडी : तालुक्यातील नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी हर्ष तुकाराम वारंग व साक्षी मोहन दळवी हे दोन विद्यार्थी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग मार्फत ‘इस्त्रो’ वैज्ञानिक सहलीसाठी विक्रम साराभाई भारतीय अंतरिक्षा विज्ञान केंद्र, तिरुवअनंतपुरम येथे जावून आल्याबद्दल प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी दोन्ही विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

‘इस्त्रो’ याठिकाणी जाण्याची संधी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हापरिषद, सिंधुदुर्ग यांनी सहलीचे आयोजन चांगल्या प्रकारे केले. खेड्यापाड्यातील बुध्दिमान विद्यार्थ्यांनां विमानातून प्रवास करून दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार व्यक्त केले. तसेच अग्निबाण प्रतिकृती, इस्रोची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिल्याबद्दल त्यांचे ही विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. यागुणी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.


