मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि मॉडेल नताशा स्टँकोविक यांचा 18 जुलै 2024 रोजी घटस्फोट झाला होता. हार्दिक आणि नताशाला एक मुलगा आहे. या मुलाचे दोघंही मिळून सांभाळ करताय. दरम्यान, नताशासोबत घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका व टीव्ही स्टार जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. याचवेळी आता नताशाने देखील पुन्हा प्रेमात पडण्यास मी तयार असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणाली नताशा ?
एका मुलाखतीमध्ये नताशा स्टँकोविक म्हणाली की, मागील वर्ष तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. पण आता मी आयुष्यात नवीन सुरुवात करण्यास तयार आहे. मी पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. आयुष्यात जे काही येईल ते स्वीकारावं, असं माझं मत आहे. तसेच योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, असंही नताशा स्टँकोविकने म्हटलं आहे. पुढील वर्षाकडे पाहताना, मी निश्चितच नवीन अनुभवांसाठी, संधींसाठी आणि कदाचित प्रेमासाठी देखील तयार आहे. मी प्रेमात पडण्याच्या विरोधात नाही. आयुष्यात जे काही येईल ते मी स्वीकारण्यास तयार आहे, असं नताशाने स्पष्ट केले.


