सावंतवाडी : ‘आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा’ संघटनेतर्फे ‘रंगोत्सव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मिलाग्रीस हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. कु. दीपलक्ष्मी विजय बांदेकर हिला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. कु. आर्या स्वप्नील सोन्सूरकर हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तर कु. देवांग लक्ष्मण बोगार याला चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच ‘क्रिएटिव्ह आर्टिस्ट अवॉर्ड ‘ कु. दिव्या संतोष राऊळ हिला मिळाला.
6 विद्यार्थ्यांनी चषक व प्रशस्तीपत्रक तर 11 विद्यार्थ्यांनी पदक व प्रशस्तीपत्र पटकावले. 7 विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक फा. रिचर्ड सालदान्हा यांनी चषक, पदक, प्रशस्तीपत्रक देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
‘मिलाग्रीस’चे विद्यार्थी रंगोत्सव स्पर्धेत चमकले.!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


