सावंतवाडी : मुंबई- गोवा महामार्गावर कणकवली ,ओसरगाव टोलनाक्याच्या बाजूला कणकवलीच्या दिशने उभा करुन ठेवलेल्या बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच. १५ जी.व्ही. ९७८ या वाहनाची ट्रॅफिक पोलीसांसमवेत व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी तपासणी केली असता वाहनावर वाहनचालक नसल्याचे दिसून आले, या वाहनाचा संशय आल्याने या वाहनाची तपासणी केली. असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटी दारुचे एकूण ७९ बॉक्स जप्त करण्यात आले, सदर मिळून आलेले ७९ बॉक्स व बोलेरो पिकअप मध्ये एकृण रू १२,८६,०००/ किंमतीचा मुद्येमालाहीत जप्त करून ताब्यात घेण्यात आला. या गुन्हयातील अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
सदरील कारवाई उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या प्रत्यक्ष मागदर्शनाखाली श्री. एस. डी. पाटील (दुय्यम निरीक्षक) यांनी कारवाई केली, सदर कारवाईमथ्ये श्री. एस.डी. पाटील, दुय्यम निरीक्षक, श्री. जे. एस. मानेमोड व श्री. संतोष घावरे, दुय्यम निरीक्षक, श्री, एस. एस. चौधरी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्रीम, एस. एस, कुवेसकर महिला जवान श्री. ए.टी. गावडे जवान, व ट्राफिक पोलीस हवालदार श्री. कॅलिस डिसोजा व नितीन चोडणकर यांनी मदत केली.
पुढील तपास श्री. एस. डी. पाटील करीत आहेत.


