Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

शिक्षण विभागाचा ‘तो’ आदेश शाळा आणि व्यवस्थापन यांच्या दृष्टीने अन्यायकारक ! ; सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे, सचिव रामचंद्र घावरे यांचे प्रतिपादन.

सिंधुदुर्गनगरी : पहिली ते नववी परीक्षा आता पर्यंत शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक स्तरावर नियोजन करून घेतल्या जात असत.या संदर्भात शाळा संहिता आणि खाजगी शाळा नियमावलीने शाळांना तसे अधिकार दिलेले आहेत.यानुसार परीक्षा घेतल्या जातील.शिक्षण विभागाने परिक्षेसंदर्भात आणि शाळेच्या वेळापत्रकासंदर्भात काढलेले आदर्श मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन यांच्या दृष्टीने अन्यायकारक आहेत असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री वामन तर्फे आणि सचिव श्री.रामचंद्र घावरे यांनी केले आहे.


यासंदर्भात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदने परिक्षेसंदर्भात काढलेल्या जी आर बाबत फेर विचार करावा, अशी मागणी मुख्याध्यापक महामंडळ व इतर संघटना यांनी केलेली होती.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आ. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे= यांच्या माध्यमातून ही मागणी केलेली होती.शासनाने याचा फेरविचार केलेला नाही.तसेच अलीकडे सात वाजता शाळा भरविण्यात यावी असा काढलेला आदेश सुद्धा संयुक्तिक नाही.कारण ग्रामीण भागातील दोन -चार किलोमीटर अंतरावरुन चालत येणारी मुले सात वाजता शाळेत उपस्थित राहणे शक्य होणार नाही.त्यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शाळांनी केलेले नियोजन हे योग्य आहे असेही मुख्याध्यापक संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नववी पर्यंतच्या परीक्षा आणि शाळेची वेळ याचे नियोजन हे पुर्णपणे शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्या नियंत्रणाखाली असते.त्यानुसार कार्यवाही करण्याचा अधिकार त्यांना देण्यात यावा अशी मागणी मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles