गुवाहाटी : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सवर ६ धावांनी मात केली. चेन्नईला १८३ धावांचा पाठलाग करताना २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून १७६ धावाच करता आल्या. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. राजस्थान रॉयल्सने नितीशा राणाच्या आणि वानिंदू हसरंगाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. यासह राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२५ मध्ये विजयाचे खाते उघडले, तर चेन्नई सुपर किंग्जला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्कारावा लागला.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नई निर्धारित षटकात ६ बाद १७२ धावाच करु शकली. गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानने ९ विकेटच्या मोबदल्यात १८२ धावा काढल्या. प्रत्त्युत्तरात चेन्नईने १९.४ षटकांत ६ गडी गमावून १७२ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि जिमी ओव्हरटन क्रीजवर शेवटपर्यंत तग धरून होते. एमएस धोनीने १६ धावांवर खेळत असताना संदीप शर्माच्या चेंडूवर हेटमायरकरवी झेलबाद झाला.
कर्णधार ऋतुराज गायकवाड ६३ धावा करून बाद झाला. त्याला वानिंदू हसरंगाच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालने झेलबाद केले. त्याने विजय शंकर (९ धावा), शिवम दुबे (१८ धावा) आणि राहुल त्रिपाठी (२३ धावा) यांनाही बाद केले. रचिन रवींद्र (०) ला जोफ्रा आर्चरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. चेन्नईला सलग दुस-या पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजस्थानने संघाचा ६ धावांनी पराभव केला. संदीप शर्माने शेवटच्या षटकात उत्तम कामगिरी बजावली.
कर्णधार ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी –
राहुल त्रिपाठी आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी डाव सावरला. दोघांमध्ये दुसऱ्या विकेट्ससाठी ३९ चेंडूत ४६ धावांची भागीदारी झाली. त्रिपाठी २३ धावा करून बाद झाला. त्याच वेळी, गायकवाडने ४४ चेंडूत ६३ धावा केल्या, त्याच्याशिवाय शिवम दुबेने १८, विजय शंकरने नऊ, महेंद्रसिंग धोनीने १६ धावा केल्या. रवींद्र जडेजा आणि जेमी ओव्हरटन अनुक्रमे ३२ आणि ११ धावांवर नाबाद राहिले. या सामन्यात राजस्थानकडून वानिंदू हसरंगाने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय जोफ्रा आर्चर आणि संदीप शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
नितीशने कर्णधार रियान परागसोबत २४ चेंडूत ३८ धावांची भागीदारी केली. यादरम्यान, डावखुरा फलंदाज नितीशने २१ चेंडूत आपले १९ वे अर्धशतक पूर्ण केले. ३६ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. धोनीने त्याला यष्टीचित केले. १२४ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर राजस्थानचा डाव डळमळीत झाला. या सामन्यात ध्रुव जुरेलने तीन धावा, वानिंदू हसरंगाने चार धावा आणि कुमार कार्तिकेयने एक धाव केली. दरम्यान, महिश तीक्षना आणि तुषार देशपांडे यांनी अनुक्रमे दोन आणि एक धावा काढून नाबाद राहिले. जोफ्रा आर्चरला त्याचे खातेही उघडता आले नाही. चेन्नईकडून नूर अहमद, खलील अहमद आणि मथिशा पाथिराना यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.


