Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘Enemy Of America’ – २०, २१ आणि २२ व्या शतकाचे धक्कादायक, कलात्मक अन् वैचारिक काव्यमय चिंतन करणारी कादंबरी.!

सावंतवाडी : अलीकडेच झालेला जागतिक रंगभूमी दिन तसेच ‘एनिमी ऑफ अमेरिका’ या कादंबरीवर युरोपीय देशात होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लेखक, नाटककार डॉ. अनिल जिजाबाई कांबळे (सरमळकर) यांच्याशी त्यांच्या वाढदिवस निनीत्ताने साधलेला हा संवाद –
……………………………..

प्रश्न : तुमचे Enemy of America आज मोठ्या प्रकाशझोतात आले आहे तेही जागतिक पातळीवर. The fox, Its Already Tomorrow, Death of Arts इत्यादी पुस्तकांनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव होत असलेले आणि त्याहीपेक्षा अधिक व्यापक खळबळजनक ठरेल अशी ही आगळीवेगळी कादंबरी आहे. पुस्तक अमेरिकेत प्रकाशित झाल्यावर त्याच्या नावामुळेच चर्चेत आले आहे. सुरुवातीलाच युरोपीय देश असलेल्या बल्गेरिया या देशात या पुस्तकावर तेथील साहित्यिकांनी चर्चेचे आयोजन केले आहे त्याबद्दल सांगा.

लेखक अनिल कांबळे :  या पुस्तकाचे नावच सर्वांचे लक्ष वेधुन घेणारे ठरले आहे. माझे प्रकाशक आणि मी या पुस्तकाबद्दल खुप पॉजिटिव होतो. खुप आत्मविश्वास होता. दीर्घ चर्चा व इतर आवश्यक प्रक्रियेसाठी वेळ दिल्यानंतर
नाताळाच्या पवित्र पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर २०२४ रोजी पुस्तक अमेरिकेत न्यूयॉर्क येथे प्रकाशित झाले व आता पुस्तकाला मोठा प्रतिसाद मिळत असुन पुस्तकात नेमके काय सांगितले गेले आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे भारतीय व परदेशातील वाचकांमध्ये. तसेच या पुस्तकावर बल्गेरिया देशात खास चर्चेचे आयोजन केले आहे.

प्रश्न : अमेरिके संदर्भात आहे का हे पुस्तक ? कोकणात राहुन तुम्ही हे धाडस कसे केले ?
नक्की काय आहे हे पुस्तक?, आमच्या वाचकांसाठी थोडक्यात सांगा.

लेखक अनिल कांबळे : मला आठवतं मी एस वाय बी ला असतांना पासूनच अमेरिकेबद्दल जे जे मिळेल ते वाचत आलो आहे. आता सर्वानाच माहीती आहे की अमेरिका हा अती भांडवलशाही व प्रचंड श्रीमंत असलेला तेवढाच जगावर वर्चस्व गाजवणारा देश आहे मात्र अमेरिका तेवढीच लोकशाही मुक्त विचार स्वातंत्र्य मानव अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य साहित्य संगित विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी बाबत खुप ग्रेट आहे. मात्र हे पुस्तक मी काही वर्षांपूर्वीच लिहु पाहत होतो ते शक्य झाले नाही. मात्र अमेरिकेबद्दल जी सर्वसामान्य माहीती सर्वांना आहे किवा असते ते या पुस्तकात काहीच नाहीये. या कथेचा बॅकड्रॉप अमेरिका आहे मात्र इथे तुम्हाला पाहायला मिळेल ते वेगळेच मॅजिकल कथात्मक काव्यमय वैचारीक सत्य असेल. हे पुस्तक अमेरिकेबद्दल आहे किवा नाही ते वाचकांना समजेलच ते त्यांनीच ठरवायचे आहे.
Enemy of America लिहुन झाले होते २०१५ मध्येच मात्र त्यावर पुन्हा खुप काम करावे लागले. तसेच अशा पुस्तकाला कोण प्रकाशक मिळेल याचीही खात्री नव्हती. प्रकाशक ठरल्यानंतरही पुस्तकाचे नाव यावरुन खुप चर्चा झाली तसेच लेखनावर पुन्हा काम करावे लागले प्रकाशक ॲंथनी आणि मी दोन वर्षे ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो. पुस्तकाचे मुळ नाव Enemy America होते त्यात बदल करुन शेवटी ते Enemy of America असे करण्यात आले. हो अर्थातच हे पुस्तक एक धाडसच आहे. ज्येष्ठ विचारवंत कला समीक्षक रेमोस यांनी या पुस्तकाबद्दल अभिप्राय देताना म्हणाले आहेत की ‘ विसाव्या एकविसाव्या व बाविसाव्या शतकाचे हे धक्कादायक गंभीर चिंतन आहे’.
मी लेखक म्हणून जे आजवर लिहित आलो ते एक धाडसच होते. मात्र एनिमी ऑफ अमेरिका लिहिणे एक मोठे आव्हान व धाडस आहे हे मीही मान्य करतो. माझे सर्वच लेखन मी कोकणात राहून केले आहे. तुम्ही राहता कोठे यापेक्षाही तुम्ही काम काय करता हे अधिक महत्वाचे आहे.

प्रश्न : एका साहित्यिक मॅगझिनने या पुस्तकाबद्दल बोलताना म्हटले आहे की हे पुस्तक तुम्हाला स्टार लेखक बनवेल. काय वाटते तुम्हाला ?

लेखक अनिल कांबळे :  मी गेली बावीस तेवीस वर्षे लिहितोच आहे. कठीण परिस्थितीतून गेलो. मात्र मी आजही खूप साध्या परिस्थितीच जगतो आहे. मात्र लेखन आता खूपच वेगळ्या उंचीवर व जगात पोहचत आहे तेच एक समाधान आहे. मी स्टार होण्यापेक्षा माझे लेखन कधीकाळी स्टार बनले तर अधीक आनंद होइल. मला आजही असे नाही वाटत की मी मोठा लेखक झालो आहे. अजून बरेच काम व्हायला हवे आहे माझ्याकडून असे मला वाटते.

प्रश्न : मराठी किवा भारतीय प्रस्थापित व दलित साहित्य प्रवाहाने तुमची नेहमीच उपेक्षा केली हे वास्तव आहे. अनेक अडथळे प्रतिकूल स्थिती आणि प्रतिकूल लोकमत असूनही अविश्वसनिय वाटेल अशी तुम्ही झेप घेत जागतिक रंगभूमी व जागतिक साहित्य क्षेत्राला तुमची दखल घेण्यास भाग पाडले. हे सारेच कठीण कार्य तुम्ही कसे साध्य केले ?

लेखक अनिल कांबळे :  मी तेव्हाही आजही साहित्य रंगभूमी कला तत्वज्ञान व सिनेमा इत्यादींची वाट सोडलेली नाही. हे कार्य मी छंद म्हणुन नाही केले आहे तर ते अत्यंत गंभीर कार्य आहे म्हणुन करत आलो आहे. माझी व माझ्या लेखनाची खुप अवहेलना उपेक्षा झाली आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. बदनामीचा सिलसिला तर आजही संपत नाही. कठीण काळात तेव्हा जसा आई जिजाबाई हिने मला धीर दिलाय तेच कार्य आज माझी पत्नी अपर्णा करते आहे अन्यथा माझा हा संघर्ष एकाकी होता व आहे. आई व पत्नीचे अर्थातच खुप ऋण आहेत माझ्यावर. जीथे दलित किवा मराठी साहित्यात मला स्थान दिले जात नव्हते तिथे आज वैश्विक स्तरावर मला स्विकारले जात आहे हे सोपे नव्हतेच. अशा सर्व प्रतिकूल अवस्थांमधून इथवर पोहचणे अर्थातच त्यामागे न थांबता केलेला प्रचंड व्यासंग आहे हेही तेवढेच खरे.

प्रश्न : जागतिक रंगभूमी दिन २७ मार्च रोजी असतो या पार्श्वभूमीवर एक मराठी इंग्रजी भाषेतील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार म्हणुन तुम्हाला आजच्या मराठी भारतीय व जागतिक रंगभूमीबद्दल काय वाटते ?

लेखक अनिल कांबळे : गेले दशकभरापासून मी प्रत्यक्ष रंगभूमीवर कार्यरत नाहीये मात्र नाटककार म्हणुन मराठी तसेच एकूण भारतीय व जागतिक रंगभूमीशी जोडलो गेलो आहे. भारतीय रंगभूमी आज खऱ्या अर्थाने खुप कमी प्रकाशात आहे कारण इतर माध्यमे अधिक प्रभावी झाली आहेत. मात्र रंगभूमीचे जे सामर्थ्य असते ते आजही शिल्लक आहे मात्र त्याचा आवाज क्षीण झालेला आहे आणि तेथील प्रयोगक्षमता आणि भव्यता कुठेतरी हरवली आहे.
जागतिक रंगभूमीवरही भव्य प्रयोग होत आहेत मात्र ती भव्यता केवळ सादरीकरणात जास्त आहे आणि विचारात कमी आहे. खरे तर जागतिक रंगभूमीही एका स्थितीशिलतेत अथवा stagnation मध्ये सापडली आहे काहीशी. जगातील सर्व भव्य किवा उत्कृष्ट नाटके आजही अमेरिकन ब्रॉडवे व ऑफ ब्रॉडवेवर होत आहेत. मात्र तिथेही श्रेष्ठ नाटककारांच्या नाट्यकृतीपेक्षा प्रचंड व्यवसाय करणाऱ्या नाट्यकृती जास्त सादर होताना दिसतात. अर्थात श्रेष्ठ नाट्यकृतीही सादर होत असतात कदाचित त्याचे प्रमाण कमी असेल.

प्रश्न : अर्थात एकूणच रंगभूमी एका आव्हानात्मक स्थितीत अडकली आहे का ? या आवर्तातून रंगभूमी कशी बाहेर पडु शकेल ?

लेखक अनिल कांबळे :  हो.., मला वाटते एकूणच जगभरातील रंगभूमी आजच्या काळातील उपलब्ध झालेल्या मनोरंजनाच्या अनेक प्लॅटफॉर्म्स मुळे तिच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
यातुन बाहेर पडायचे असेल तर मोठ्या नाटककार निर्मात्यांपेक्षा दिग्दर्शाकांपेक्षा नव्या युगाची रंगभूमी निर्माण करणाऱ्या विचारवंत नाट्यकर्मींची जगभर गरज आहे. कालची रंगभूमी महान नाटककारांवर जिवंत राहिली होती तेवढीच ती महान प्रेक्षकांच्या आश्रयावर जिवंत राहीली होती. आता नव्यानेच पुन्हा परंपरा नवतासहीत किवा त्याहीपलीकडे जात नव-आधुनिक किवा उत्तर – उत्तर- आधुनिक रंगभूमीची निर्मिती करावी लागेल त्यासाठी नव्या पिढीतील नवे विचारक रंगकर्मी आवश्यक आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles