कुडाळ : दहावीच्या परीक्षेनंतर पुढील शिक्षणाची योग्य दिशा कशी निवडावी? कोणत्या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत? आणि स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी? या व अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळवण्यासाठी खास कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
“यशस्वी करिअरचा राजमार्ग” या विशेष कार्यशाळेत इ. 11 वी सायन्स शाखेतील प्रवेश प्रक्रिया, JEE / NEET / MH-CET / UPSC / MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी, तसेच इंजिनिअरिंग, मेडिकल, डिफेन्स आणि रिसर्च क्षेत्रातील करिअरच्या संधी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

कार्यशाळेचे विशेष मार्गदर्शक असतील प्रा. डॉ. राजाराम परब, जे प्रसिद्ध करिअर मार्गदर्शक, ‘यशस्वी भव’ या पुस्तकाचे लेखक, तसेच विज्ञान शाखेतील 15 वर्षांचा अध्यापन अनुभव असलेले तज्ज्ञ आहेत.
योग्य करिअर निवडीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन. विविध प्रवेश परीक्षांचे स्वरूप व तयारीच्या पद्धती. प्रश्नोत्तरांसाठी राखीव 30 मिनिटे ही या कार्यशाळेची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत.
कार्यशाळा आज शनिवार, 05 एप्रिल 2025 सायं. 04:00 वाजता कुडाळ हायस्कूल सभागृह, कुडाळ येथे असणार आहे.
ही कार्यशाळा फक्त पहिल्या 100 पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी 9325017458 / 9767125403 या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन प्रा. परब यांनी केले आहे.
ADVT –


सोने तारण कर्ज योजना.! – सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग, यांची अभिनव योजना.


