मोहाली : राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2025 मध्ये शानदार पुनरागमन केले आहे आणि सलग दुसरा विजय नोंदवला आहे. संजू सॅमसनच्या संघाने हंगामातील त्यांच्या चौथ्या सामन्या पंजाब किंग्जचा 50 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे, पंजाब किंग्जला या हंगामात पहिल्याच समस्येला सामोरे जावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर या पराभवाचा सामना करावा लागला, जिथे ते या हंगामातील पहिला सामना खेळत होते. याचा अर्थ संघाचे घरवापसी चांगले नव्हते.
शनिवारी 5 एप्रिल रोजी पंजाबच्या नवीन घर मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान पंजाब किंग्ज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आले. नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि नवा प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले. राजस्थानला पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला होता पण तिसऱ्या सामन्यात संघाने विजय मिळवला. अशा परिस्थितीत, पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. पंजाब किंग्ज चौथ्या स्थानवर घसरली आहे. तर राजस्थान रॉयल्स सातव्या क्रमांकावर आली आहे.
पंजाब एक्सप्रेस रुळावरून घसरली –
206 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाबची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने प्रियांश आर्य आणि कर्णधार श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यानंतर चौथ्या षटकात मार्कस स्टोइनिसही आऊट झाला. त्याच्या बॅटमधून फक्त एक धाव आली. कार्तिकेयने सातव्या षटकात प्रभसिमरनला शिकार बनवले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि नेहल वधेरा यांच्यात एक शानदार भागीदारी झाली. नेहलने 62 धावांची खेळी केली. मॅक्सवेलनेही 30 धावा केल्या. पण दोघेही एकामागोमाग आऊट झाले. यानंतर पंजाबचा एकही फलंदाज टिकू शकला नाही आणि पंजाबला 20 षटकांत फक्त 155 धावा करता आल्या. या पराभवानंतर पंजाबचा विजय रथ थांबला आहे.
यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनने घातला तांडव…
या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी त्यांच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 89 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर लॉकी फर्ग्युसनने दोन्ही फलंदाजांची शिकार केली. या सामन्यात कर्णधार म्हणून खेळणारा सॅमसन 26 चेंडूत 38 धावा काढून बाद झाला, तर डावखुरा फलंदाज यशस्वीने तीन चौकार आणि पाच षटकारांसह 67 धावा केल्या. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 10 वे अर्धशतक 40 चेंडूत पूर्ण केले. हे त्याचे सर्वात हळू अर्धशतक देखील आहे. डावखुऱ्या फलंदाजाने यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्ध (आयपीएल 2024) 31 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. सॅमसन-जैसवाल व्यतिरिक्त, रियान परागने 43*, नितीश राणा यांनी 12, शिमरॉन हेटमायरने 20 आणि ध्रुव जुरेलने 13* धावा केल्या.


