Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

पुतिनचा नाद खुळा.! ; रशियाने पाण्याच्या आत ‘हे’ केले अन् ब्रिटनचे धाबे दणाणले.!

मॉस्को  : हेरगिरीच्या विश्वात रशिया आणि त्यांचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची एक वेगळी ओळख आहे. रशियाचे राष्ट्रप्रमुख बनण्याआधी पुतिन हे केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेत अधिकारी होते. सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. युक्रेन विरुद्ध सुरु असलेल्या या युद्धादरम्यान रशियाची हेरगिरीची एक पद्धत समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण युरोप हादरलं आहे. ब्रिटनला पाण्यात एक हेरगिरी करणारा कॅमेरा मिळाला आहे. हा रशियन कॅमेरा असल्याच सांगितलं जातय. रशियाने अजूनपर्यंत यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

ब्रिटिश वर्तमानपत्र टेलिग्राफनुसार, ब्रिटनच्या परमाणू संयत्राजवळ हा कॅमेरा मिळाला आहे. हा कॅमेरा पाण्याच्या वर आणि खाली लावलेला होता. पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये हेरगिरीची ही पद्धत दिसून आलीय. ब्रिटनची आर्मी 2 प्वॉइंट या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. सर्वप्रथम हा कॅमेरा बसवला कसा? आणि दुसरी गोष्ट हा कॅमेरा लावला कोणी? याचा तपास सुरु आहे. अण्विक पाणबुडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हा कॅमेरा लावल्याच ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. ब्रिटनची अण्विक पाणबुडी कशी हालचाल करते, ते रशियन अधिकाऱ्यांना जाणून घ्यायच होतं.

ही पाणबुडी केबल तारा कापण्याच काम करते –

युद्धात अण्विक पाणबुडी महत्त्वाची मानली जाते. ब्रिटनची वॅनगार्ड अण्विक पाणबुडी सर्वात खतरनाक मानली जाते. याच पाणबुडीच्या रेकीसाठी पाण्याच्या वर कॅमेरे लावण्यात आले आहेत. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान ब्रिटनने जाहीरपणे व्लादिमीर पुतिन यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. अमेरिकेने युक्रेनला मदतीसाठी नकार दिला, त्यावेळी ब्रिटन आणि फ्रान्सने युरोपियन युनियनची बैठक बोलावली.

त्यानंतर रशियाने मोर्चा उघडला –

ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ही बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वांनी मिळून पुतिन यांच्याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. यानंतर अंटलांटिक आणि बाल्टिक एरियामध्ये रशियाने मोर्चा उघडला आहे. नॉर्वेजवळ रशियाची एक पाणबुडी दिसलेली. रशियाची ही पाणबुडी केबल तारा कापण्याच काम करते. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांना भिती आहे की, याच पाणबुडीद्वारे पाण्यात हेरगिरी करणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles