चंदीगड : पंजाब किंग्सच्या प्रियांश आर्यने चेन्नई विरुद्ध 42 चेंडूत 103 धावांची आक्रमक खेळी केली. यावेळी त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. एका बाजूला धडाधड विकेट पडत असताना त्याचा झंझावात सुरु होता. त्याच्या आक्रमक खेळीमुळे पंजाब किंग्सने 219 धावांपर्यंत मजल मारली.
प्रियांश आर्यने फक्त 39 चेंडूत शतक पूर्ण केलं. ईशान किशननंतर या स्पर्धेत शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा आक्रमक बाणा दाखवला आणि अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलच्या इतिहासात शतक करणारा प्रियांश आर्य हा आठवा अनकॅप्ड खेळाडू ठरला आहे. याआधी शॉन मार्श (2008), मनीष पांडे (2009), पॉल वल्थाटी (2009), देवदत्त पडिक्कल (2021), रजत पाटीदार (2022), यशस्वी जैस्वाल (2022) आणि प्रभसिमरन सिंग (2023) यांनी अशी कामगिरी केली आहे.


