कणकवली : दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सदरचे आदेश करण्यात आले आहे.
अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई हे सदर मोहिमेकरिता मुख्य समन्वयक म्हणून काम पाहणार असून सदरचे आदेश ३० जून २०२५ पर्यंत वैध राहणार आहेत. प्रशिक्षित हत्तीच्या सहाय्याने सदरच्या ओंकार या नर हत्तीस बेशुद्ध करून पकडून तज्ज्ञांच्या सल्ल्याने सदर हत्तीच्या पुनर्वसनाची योग्य ती व्यवस्था करावी, असेही मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांना दिलेल्या आदेशात मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी म्हटले आहे.
माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश.! ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाने उचलली पाऊले.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


