नाशिक : नाशिकच्या जेलरोड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. पत्नीला मारल्यानंतर त्याने स्वतः गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुरलीधर जोशी (78) व लता जोशी अशी मृतांची नाव आहेत. दोघेही निवृत्त शिक्षक आहेत. या जोडप्याची दोन मुलं मुंबईत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. नाशिक येथे मुरलीधर जोशी व लता जोशी अपार्टमेंटमध्ये दोघेच राहत होते. लता जोशी यांना 2017 पासून मेंदू विकाराचा त्रास होता. एकदा व्हेंटिलेटरवरही होत्या.
दीर्घ आजारपणामुळे हे दांपत्य कंटाळलं होतं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुरलीधर जोशी यांनी म्हटलं आहे की, “पत्नीला स्वर्गलोकी पाठवले, आता तिच्यासोबत जात आहे. आमच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही”. पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरात हळहळ आणि शोक व्यक्त होत आहे.


