Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘त्या’ नराधमांना तात्काळ अटक करा.!, उबाठा सेनेचे पदाधिकारी आक्रमक. ; कुडाळ पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर.

कुडाळ : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणानं सद्या अख्खा महाराष्ट्र हादरला आहे. अगदी अजाणत्या वयातच दोन चिमुकल्यांना सोसाव्या लागलेल्या या वेदनांमुळे केवळ बदलापुरातील नव्हे तर देशातील प्रत्येकजण हळहळला आणि चिमुरड्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. अनेकांनी प्रशासनाला धारेवर धरलं आणि चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या क्रूर नराधमाला फासावर लटकवा, असा एकच सूर लावून धरला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असंही सांगितलं आहे. तरीदेखील नागरिकांचा रोष काही कमी होण्याचं नाव घेत नाही.

आज या घटनेच्या अनुषंगाने कुडाळ येथे उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले. बदलापूर केस फास्टट्रॅकवर घेऊन गुन्हेगारांचा तात्काळ शोध घ्यावा व त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुडाळ पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, मंदार शिरसाट, संतोष शिरसाट, अतुल बंगे, राजू गवंडे, गुरू सडवेलकर, अनुप नाईक, चेतन शिरोडकर, उदय मांजरेकर, नितीन सावंत, शुभम सिंदगिकर तसेच महिला महिला पदाधिकारी श्रेया परब, श्रेया गवंडे, ज्योती दळवी, श्रुती वर्दम, सई काळप, रोहिणी पाटील, शितल देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles