सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव सरपंच पदी हनुमंत पेडणेकर यांनी पुन्हा एकदा कारभार स्वीकारला आहे. त्याबद्दल तालुका भंडारी मंडळाच्या वतीने त्यांचा संपूर्ण कार्यकारिणी व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, देविदास डाडरकर, संतोष वैज, बिरजे, ज्ञानदीप राऊळ, नामदेव साटेलकर, सचिव दिलीप पेडणेकर, चंदू वाडकर, सिद्धार्थ पराडकर, जोशी, संजय पिळणकर, देवता पेडणेकर, गुरुदास पेडणेकर, सतीश नाईक, लहू कुडव, सुरेश राऊळ आदि उपस्थित होते.


