Wednesday, October 29, 2025

Buy now

spot_img

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून कारागृहातील बंदिवानांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन. ; निमित्त जागतिक आरोग्य दिनाचे. 

सावंतवाडी : ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेमार्फत अनेक समाजहिताचे उपक्रम नेहमीच राबवले जातात. आज जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून कारागृहातील बंदिवानांसाठी या संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 65 जणांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कारागृह अधीक्षक सतीश कांबळे व वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांनी कौतुक केले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक अरुण मेस्त्री म्हणाले, सामाजिक बांधिलकीचे अनेक सेवाभावी उपक्रम आपण नेहमी पाहतो. परंतु या उपक्रमाने आपण भारावून गेलो. संस्था तन-मन-धन या गोष्टीचा योग्य समन्वय राखून समाजामध्ये निराधार, पीडित, गरजू, आरोग्य क्षेत्र तसेच शैक्षणिक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांना मदतही सातत्याने करीत आहे. आज हा उपक्रम राबवला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आजच्या धावपळीच्या युगामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक क्षेत्रात सातत्य ठेवून वावरणे एवढं सोपं नसतं परंतु त्यांनी हे करून दाखवलं याचा सार्थ अभिमान वाटतो.

 

प्रा. रुपेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याला सलाम केला आणि कारागृहामधील बंदिवानांचे मनोबल वाढणारे प्रेरणादायी भाषण केले. तर संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना म्हणाले बंदिवानांची येथून सुटकेनंतर पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर अॅड. पूजा नाईक (विधी सेवा समिती ) यांनी बंदिवानांना कायदेविषयक मोफत मार्गदर्शन केले. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे, शरदनी बागवे, लक्ष्मण कदम, समीरा खलील, हेलन निब्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे, प्रभारी पीआय निसर्ग ओतारी, अॅड.  पूजा जाधव – नाईक (विधी सेवा समिती), ज्येष्ठ नागरिक अरुण मेस्त्री, प्रा. रुपेश पाटील, आपला दवाखान्याचे आरोग्य अधिकारी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. निखिल अवधूत, आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ. नंददीप चौडणकर, जिल्हा रुग्णालयाचे अक्षय नाईक,अदिती कशाळीकर एनसीडी समोपदेशक उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांनी कारागृहातील 48 बंद्यांना व कर्मचारी मिळून एकूण 65 जनांवर मोफत उपचार करून मोफत औषधे उपलब्ध करून दिली.  यामध्ये जनरल चेकअप, हृदय व डायबिटीस चेकअप, डोळ्यांचा चेकअप, हाडांचा चेकअप, रक्तगट तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या. यासाठी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर,अहिल्या मेडिकलचे मालक आनंद रासम व उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्यामार्फत विनामूल्य औषधे उपलब्ध उपलब्ध.
या शिबिरासाठी आपला आरोग्य दवाखाना अधिकारी डॉ. हर्ष ईश्वरा सागावकर व जिल्हा रुग्णालय ओरोसचे अधीक्षक डॉ. श्रीपाद पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऐवळे यांचे विशेष योगदान लाभले तर आपला दवाखान्याचे सिस्टर तृप्ती अंधारी, स्मिता नाटेकर,गंगा सुतार, यशवंत परब, फार्मासिस्ट दिनार पडते यांचेही योगदान लाभले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सचिव समीरा खलील, शरदिनी बागवे,रूपा मुद्राळे, हेलन निब्रे, समिता बागवे, रवी जाधव, लक्ष्मण कदम व कारागृह कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles