कल्याण : कल्याणच्या टिटवाळा जवळील खडवलीच्या खाजगी वसतिगृहातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. सोबतच इतर मुलांना बेदम मारहाण केल्याचेही बोललं जात आहे. जिल्हा बाल कल्याण समितीच्या पाहणी दरम्यान हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, खडवलीतील पसायदान या खाजगी वसतिगृहात हा गेल्या अनेक दिवसापासून प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळ गाठत कारवाई सुरू केली असून या प्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यात आश्रम शाळा चालवणारा संचालक बबन शिंदे, त्याचा मुलगा प्रसन्न शिंदे, त्याची पत्नी आशा शिंदे , शिक्षिका दर्शना पंडित आणि कामगार प्रकाश गुप्ता यांचा समावेश आहे. मात्र या घटनेने परिसरात आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


