नागपूर : नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची भर रस्त्यावर हत्या करण्यात आली आहे. आज (19 एप्रिल) सायंकाळी 6 वाजता सहा तरुणांनी अंकुश कडू यांची हत्या केली आहे. भर रस्त्यावर कडू यांची दुचाकी थांबवून धारधार शास्त्राने त्यांच्यावर वार करत हत्या केली आहे. हत्येचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आला आहे.
जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय –
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नारी रोड वरील म्हाडा चौक इथं शिवसेनेचे माजी उप जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना येत आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु आहे.


