मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम अभिनेता ललित मनचंदा यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेरठ येथील त्यांच्या राहत्या घरी ते मृतावस्थेत सापडले. दरम्यान या घटनेने टीव्ही मालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तूर्त पोलिसांनी हा मृत्यू संशयास्पद नाही असे म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हिंदी टीव्ही अभिनेता ललित मनचंदा सोमवारी त्याच्या मेरठच्या घरी मृतावस्थेत आढळले. अवघ्या 36 व्या वर्षी त्यांनी मरणाला कवटाळले. ललित मनचंदा यांनी कशामुळे आत्महत्या केली याचीही काही माहिती समोर आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेता ललित मनचंदा यांनी तणाव आणि आर्थिक संघर्षामुळे आत्महत्या केल्याचे समजते. स्थानिक अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. तपासातील प्राथमिक निष्कर्षांवरून असे स्पष्ट होते की, अभिनेता ललित मनचंदा यांच्या मृत्यू संशयास्पद नाही. किंवा दुसऱ्या व्यक्तीया सहभाग नाही, पण तरीही पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे.
ललित मनचंदा यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांकडे विचारपूस सुरु केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळी सुसाईड नोटचा शोध घेण्यात आला पण कोणतीही सुसाईड नोट त्यांना सापडली नाही.
मानसिक तणावात होते ललित मनचंदा?
ललित मनचंदा यांच्या जवळच्या लोकांकडून माहिती मिळाली की, ते काही काळापासून मानसिक ताणतणावात होते. तसेच त्यांची भावनिक कोंडीही झाली होती. सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने 22 एप्रिल 2025 रोजी ललित मनचंदा यांच्या निधनाची खात्री केली आहे. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर श्रद्धांजली शेअर करताना, त्यांनी अभिनेत्याचा एक फोटो या संदेशासह पोस्ट केला.
अभिनेते ललित मनचंदा हे त्यांच्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमुळे जास्त ओळखले गेले. त्यासह विविध बॉलीवूड चित्रपट आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांमधील त्यांच्या संक्षिप्त पण आठवणीतील काही ठोस भूमिका त्यांनी केल्या होत्या. ये रिश्ता क्या कहलाता है, इंडियाज मोस्ट वॉन्टेड, क्राइम पेट्रोल आणि तारक मेहता का उल्टा चष्मा या त्यांच्या काही लोकप्रिय मालिका आहेत.
…………………………………….


