Monday, November 10, 2025

Buy now

spot_img

मुंबईने लखनौचे नटबोल्ट आवळले, पॉईंट टेबलमध्ये थेट दोन नंबरला उडी! ; सलग पाचवा सामना जिंकला.

मुंबई : पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की ही फ्रँचायझी इतकी यशस्वी का आहे. आयपीएल 2025 मध्ये खराब सुरुवातीनंतर जोरदार पुनरागमन करत हार्दिक पांड्याच्या संघाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने चांगली कामगिरी केली आणि लखनौ सुपर जायंट्सचा एकतर्फी 54 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि रायन रिकेल्टन यांच्या शानदार अर्धशतकांनंतर, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विल जॅक्स यांच्या धारदार गोलंदाजीमुळे हा विजय निश्चित झाला. यासह, मुंबई आयपीएलमध्ये 150 विजय नोंदवणारा पहिला संघ बनला.

मुंबई इंडियन्सचा धमाका –

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली, पण तिसऱ्या षटकातच संघाला मोठा धक्का बसला. रोहित शर्माने दोन षटकार मारून आपला चांगला फॉर्म दाखवला. पण नंतर 5 चेंडूत 12 धावा काढून तो बाद झाला. येथून रायन रिकेलटनसोबत विल जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली आणि धावसंख्या 88 पर्यंत नेली. यादरम्यान, रिकेलटनने 25 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर 32 चेंडूत 58 धावा करून आऊट झाला.

तिलक वर्मा (6 धावा) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (5 धावा) यांना फारसे काही करता आले नाही. पण एका टोकापासून सूर्यकुमार यादव वेगवान धावा काढल्या आणि 28 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. शेवटी, कॉर्बिन बॉशने 10 चेंडूत 20 धावा आणि नमन धीरने 11 चेंडूत नाबाद 25 धावा करत मुंबई इंडियन्सला मोठी धावसंख्या गाठून दिली. लखनौ सुपर जायंट्सकडून मयंक यादव आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

लखनौच्या मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बदोनी आणि डेव्हिड मिलर या 4 विस्फोटक फलंदाजांना विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात मिळाली होती. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी वेळ असतानाच या घातक फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या चौघांव्यतिरिक्त लखनौकडून एकाही फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी काही करण्याआधीच रोखलं आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles