कणकवली : विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला ही बहुजन समाजातील विद्यार्थांना शिक्षण देणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य प्रशाला म्हणून नावारूपाला आलेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे ब्रीद वाक्य ‘सत्यमेव जयते’ या वचनानुसार संस्थेने शिशू वर्गापासून पदयुत्तर वर्गपर्यंत मजल मारून शैक्षणिक विश्वात लौकीक प्राप्त केला आहे. प्रशालेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाची प्रशाला म्हणून गणली गेली पर्यावरण रक्षण वृक्ष संवर्धन , स्पर्धा परीक्षा ‘ शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा शारिरीक शिक्षण योगा प्रशिक्षण करिअर मार्गदर्शन शिबीर पाककला प्रदर्शन साक्षरता प्रसार लोककलांचे जतन नाट्य प्रशिक्षण अभिनय शिबिर असे विविधांगी उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा विकास घडवून आणला गेला देखणी इमारत प्रशस्त क्रीडांगण, विविध वृक्षांनी बहरलेली बाग , इ वैशिष्ठ्यांनी विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला नटलेली आहे
तज्ज्ञ शिक्षक वर्ग सुसज्ज ग्रंथालय या सर्व बाबींचा विचार करून तज्ज्ञ समितीद्वारे परीक्षण करून तालुकास्तरिय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकरी मा .चव्हाण साहेब गटशिक्षण अधिकारी मा गवस साहेब व मान्यवर यांच्या उपस्थितित प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर यांचा पारितोषिक देवून गौरव करण्यात आला . या प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा श्री तवटे साहेब चेअरमन डॉ . सौ साळुंखे मॅडम सचिव श्री वळंजू साहेब विश्वस्त श्री डेगवेकर साहेब व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालक वर्गांतून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे


