संजय पिळणकर –
वेंगुर्ला : आगार वाहतूक निरीक्षक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षक यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने महाराष्ट्र दिनी दी १ मे पासून वेंगुर्ला आगाराबाहेर आमरण उपोषण सुरू केले असून आजचा उपोषणाचा तिसरा दिवस असून आज उपोषणकर्ते सखाराम सावळ यांची प्रकृती खालावली आहे.त्यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात यावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्याप्रमाणे तात्काळ १०८ च्या सहाय्याने सावळ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुजोर प्रशासन आणि निष्ठुर अधिकारी यांच्या विरोधात अजूनही कर्मचारी आपल्या उपोषणावर ठाम असून उपोषण स्थळी अजूनही रा प महामंडळाच्या अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही त्यामुळे हे प्रशासन किती मुजोर व असंवेदनशील आहे हे दिसून येत आहे.


