ठाणे : कळवा येथील रायझिंग स्टार प्री प्रायमरी स्कूलच्या अत्यंत उपक्रमशील प्रिन्सिपल ममता मसूरकर यांना त्यांच्या सातत्याने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभिनव कामगिरीबद्दल ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम मोटिवेशनल अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. यावेळी उपक्रमशील प्रिन्सिपल व सामाजिक कार्यकर्त्या तसेच सातत्याने विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवत आपल्या अभिनव कामगिरीने जनसेवेचे व्रत घेतलेल्या ममता मसूरकर यांना राज्य राखीव पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक सदानंद सदांशिव, दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक व इंडियन पोलीस मित्र संस्थेचे मुख्य अधिकारी डॉ. सुरेश राठोड, राजेंद्र तामगावकर, आर.एस.पी अधिकारी अभिजीत तासगावकर, अभिजीत विभुते या मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ अशा भव्य स्वरूपात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

गार्गीज डीआयडी फाऊंडेशन आणि बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य अशा पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच रेडियंट हॉटेल, कोल्हापूर येथे करण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक डॉ. मॅडी तामगावकर तसेच डॉ. अशोक सूर्यवंशी उपस्थित होते.
कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल ममता मसुरकर यांना ‘आयडीयल प्रोफेसर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विविध योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.
ममता मसूरकर यांच्यावर या स्तुत्य कामगिरीबद्दल विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


