नवी दिल्ली : भारताने पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर मध्यरात्री जोरदार आक्रमण करत ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम फत्ते केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय सैन्यानं अचूक वेळ साधत दहशतवाद्यांसह पाकिस्तानलाही धडा शिकवला आहे. अशातच या एअर स्ट्राईकच्या आघाताचे पडसाद सोमोर येत असताना या संदर्भात अतिशय महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या या हल्ल्यात देशाचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या मसूद अजहरचं आख्खं कुटुंब संपलं असल्याची माहिती समोर आली आहे.
मसूद अझहरच्या भाऊ, बहिणीसह 14 जणांना मृत्यू –
पुढे आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ला करत दहशतवाद्यांच्या तळाला लक्ष्य केलं आहे. यातील एका तळावर वास्तव्यास असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांचा मृत्यू झाला असल्यावची माहिती समोर आली आहे. सोबतच या हल्यात मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक?
1. बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर
2. मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर
3. सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर
4. गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी
5. बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर
6. कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते.
7. बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर
8. सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर
9. महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर


